Type Here to Get Search Results !

श्री संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृहात 12वर्षय अल्पवयीन पिडीत बालकावर अनैसर्गिक अत्याचार अमडापुर पोलिस्टेशन येथे गुन्हा दाखल

श्री संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृहात 12 वर्षय अल्पवयीन पिडीत बालकावर अनैसर्गिक अत्या

.सविस्तर असेकी
चिखली तालुक्यातील ग्राम पेठ येथील श्री संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृहामध्ये ईयत्ता 07
वीत शिकत असलेल्या 12 वर्षे, 08 महिणे वयाचे अल्पवयीन बालकाने त्याच्या आईला दिनांक- 05/01/2025
रोजी दुपारचे वेळी वसतीगृहाचे अधिक्षक यांचे फोन वरून माहिती दिली की, वसतीगृह 

अधीक्षक विनायक
भगवान देशमुख (भाऊ), रा. पेठ यांने दिनांक- 03/01/2025 रोजी रात्रीचे अं. 09 ते 09.30 वाजताचे सुमारांस
भाऊने मला होस्टेलचे बाथरूममध्ये नेवुन माझ्या सोबत अनैसर्गिक अश्लिल कृत्य केले आहे, मी घरी निघुन
येतो असे म्हणुन हकिकत सांगत होता. त्यावेळी बालकाचे आईने त्याला तु एकटाच घरी येवु नको, मी तेथे
तुला घ्यायला येते असे सांगीतले व पेठ येथे जाण्यास निघुन त्याच दिवशी सायंकाळी सदर
मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, पेठ येथे जावुन मुलाला सोबत घेवुन आली.
त्यावेळी रात्री ऊशीर झाल्याने पिडीत व त्याची आई असे मेहकर येथील नातेवाईकाकडे रात्रभर
मुक्कामी राहीले. रात्री दरम्यान बालकाचे आईने बालकाला बारकाईने विचारपुस सुरू केली असता, त्यावेळी
बालकाने सांगीतले की, मागासवर्गीय वसतीगृहाचे अधिक्षक ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो तो माझ्या सोबत
मागील अंदाजे दोन महिन्यापासुन अनैसर्गिक, अश्लिल कृत्य करत होता. त्याने यापुर्वी पांच ते सहा वेळा असे
कृत्य केले आहे. दिनांक- 03/01/2025 रोजी सुध्दा त्याने माझ्या सोबत असे अश्लिल व अनैसर्गिक कृत्य
केले आहे. त्यामुळे मी दिनांक- 05/01/2025 रोजी दुपारी फोन करून आईला माहिती दिली होती. मी फोन
करून माहिती सांगीतल्याचे त्याला समजल्यावर आरोपी अधिक्षक याने मला काठीने मारहाण केली असल्याचे
बालकाने त्याचे आईला हकिकत सांगीतली. मुला सोबत घडलेल्या घटनेचा रिपोर्ट देण्यासाठी बालकाची आईने
पोलीस स्टेशनला येवुन रिपोर्ट दिला असुन, पोलीस स्टेशन अमडापुर येथे आरोपी विरूध्द अप. क्र.-
006/2025 कलम 68, 118 (1) BNS सहकलम 6, 8, 10 बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण
अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल केला.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधिक्षक श्री विश्व पासनसे साहेब, मा. अपर पोलीस
अधिक्षक श्री महामुनी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली लागलीच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर
पाटील साहेब, पोस्टेक अमडापुरचे ठाणेदार सपोनी श्री निखिल निर्मळ अशांनी पोस्टॉपसह घटनास्थळी भेट
देऊन परिस्थिती हाताळली असुन, वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सपोनी श्री निखिल निर्मळ, पोहेकॉ भगवान
शेवाळे पोस्टे अमडापुर असे आरोपीला ताब्यात घेवुन गुन्हयाचा तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments