Type Here to Get Search Results !

बुलढाणा जिल्ह्यात भीम आर्मी संघटन मोठे करणार जिल्हाध्यक्ष प्रकाश भाई धुंदळे,

बुलढाणा जिल्ह्यात भीम आर्मी संघटन मोठे करणार जिल्हाध्यक्ष प्रकाश भाई धुंदळे, खामगाव शहर मध्ये समीक्षा बैठक मध्ये निर्णय !

  दिपक पिंपळे लोणार प्रतिनिधी 

खामगाव येथे स्थानिक स्व.विलासराव देशमुख कृषि उत्पन्न बाजार समिती येथील संकुल मध्ये भीम आर्मी (भारत ऐकता मिशन) ची जिल्हास्तरीय समीक्षा बैठक पार पडली.या बैठकीस अध्यक्ष म्हणून विदर्भ निरीक्षण सुनील थोरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून शंकर जी मुन हे उपस्थित होते.बैठकीची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा महासचिव अतुल इंगळे यांनी केली.या समीक्षा बैठकी मध्ये भीम आर्मी बुलढाणा जिल्ह्या मध्ये संघटन आणखी बळकट व मजबुतीने काम करण्या साठी कार्य करेल अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष प्रकाश धुंदळे यांनी दिली,समाजातील वाढते अन्याय,अत्याचार पाहता,समाजाचे प्रश्न संसदे मध्ये मांडण्याकरिता एक मेव खासदार चंद्रशेखर आझाद हे संसदेमध्ये मांडत आहे त्यांना आणखी पाठ बळ मिळाव म्हणून बुलढाणा जिल्हा भीम आर्मी चा किल्ला म्हणून ओळखला गेला पाहिजे या करिता सर्व कार्यकर्त्यांनी जोरात कामाला लागावं असे आदेश विदर्भ निरीक्षण सुनील थोरात यांनी दिले,या बैठकीत खामगाव,जळगाव जामोद,संग्रामपूर,नांदुरा, मलकापूर,शेगाव, या तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,संघटन मजबुती साठी कार्य कशे करावे हे शंकर भाई मुन यांनी कार्यकर्त्यांना महत्त्व पटवून दिले,बैठकीमध्ये 
भीम आर्मी खामगाव शहर अध्यक्ष म्हणून भाई विवेक जी गवई यांची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकाश मोरे यांनी केले

Post a Comment

0 Comments