बुलढाणा विशेष प्रतिनिधी दिपक पिंपळे
पिंप्री खंदारे ते खळेगाव फाटा मुंबई - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणीमोठं मोठे खड्डे पडले असून बरेच अपघात झाले आहेत,या महामार्गावर दिशा दर्शक फलक नसून ब्राम्हण चिकना गावा लागत मोठा खड्डा पडला असून या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या खड्ड्यात मोठा अपघात झाल्या नंतरच संबधित विभाग खड्डा बुजविनार काय ? या महामार्गावरील वाहन धारकांना
खूप मोठा त्रास सहन कराव लागत आहे
तरी संबधीत विभागाने या कडे लक्ष देऊन रस्त्याच्या मधो मध्ये पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजविन्याचे काम सुरू करावे .
मुंबई - नागपूर महामार्ग
असल्यामुळे या मार्गावर रात्रंदिवस अवजड वाहनांची मोठी वर्दळ वाढली
आहे तरी संबधित विभाग या कडे दुर्लक्ष करत आहे , लोणार हे जागतिक पर्यटक स्थळ आल्यामुळे पर्यटक हे या माहमार्गाने प्रवास करत आहे आणि चालक हे गाडी चालवत असताना खड्डे हुकविण्याच्या प्रयत्न करत असतात त्यामुळे कोणताही अनर्थ होऊ शकतो . तरी संबंधीत विभागाने या कडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवून वाहनधारकांना दिलासा द्यावा
Post a Comment
0 Comments