Type Here to Get Search Results !

नूतन महाविद्यालय सेलू येथील प्रज्ञा शेजूळ यांना पारितोषिक

  महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी तथा प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड च्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठ स्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या निबंध स्पर्धेत नूतन महाविद्यालय सेलु ची बी.ए. व्दितीय वर्ष ऐच्छिक हिंदी ची विद्यार्थीनी प्रज्ञा मच्छिंद शेजुळ हिला व्दितीय पारितोषिक प्राप्त झाले . तर रुपाली सुंदरराव शेजुळ हिला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा आज प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड येथे पार पडला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर गंगाखेडकर सर होते. तर प्रमुख प्राहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके सर होते. त्याचबरोबर व्यासपीठावर डॉ.रमेश कुरे सर , उप प्राचार्या शुकला मॅडम, उपप्राचार्य स्वामी सर, हिंदी विभागाध्यक्ष डॉ. मारोती लुटे सर होते. या यशाबद्दल महाविद्याल याचे प्राचार्य डॉ. यु. सी. राठोड सर, उपप्राचार्य डॉ. खाडप सर, हिंदी विभागाध्यक्षा डॉ. अर्चना पत्की, डॉ. पुरुषोत्तम व्यवहारे , डॉ. सत्वशीला मान आदि ने अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments