Type Here to Get Search Results !

डॉ. श्याम वाघ जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


जिल्हा परिषद हायस्कूल, धाड येथे विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असलेले उपक्रमशिल शिक्षक डॉ. श्याम चिंधाजी वाघ यांना शासनाचा सन २०२४-१५ चा 'जिल्हास्तरिय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार' जिल्हा परिषद बुलढाणा चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गुलाबरावजी खरात (भा.प्र.से.) यांचे हस्ते शाल, गुलाबपुष्प, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन आईसह सन्मानित करण्यात आले.

जि.प. हायस्कूल, धाड येथिल शिक्षक डॉ. श्याम चिंधाजी वाघ यांना नुकतिच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ, अमरावती कडुन इंग्रजी विषयामधे Ph.D. प्रदान केलेली आहे. सदर शिक्षक हे एक उपक्रमशिल शिक्षक असून विदयार्थ्यांच्या हितासाठी अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यावरण पुरक विविध कार्यक्रम त्यांनी उत्कृष्टपणे राबवलेले आहेत. विविध स्पर्धा परिक्षांचे प्रभावी अध्यापन केलेले आहे. NMMS, वृक्षारोपण, शालेय शिस्त
 मुल्यशिक्षण, परिसर स्वच्छत्ता यामध्ये त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीची प्रशासनाने स्वतः दखल घेतली आहे. या भव्य दिव्य समारंभप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. मोहन साहेब, मा. आशिष पवार, मा. शिक्षणाधिकारी विकास पाटील, डाएट चे प्राचार्य मा. भटकर साहेब, उपशिक्षणाधिकारी मा. उमेश जैन, सर्व BEO मान्यवर उपस्थित होते. त्यामुळे धाड येथिल शाळा व्यवस्थापन समिती, गावकरी, पालक,शिक्षक विद्यार्थी सर्व स्तरांतून आनंद व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments