Type Here to Get Search Results !

डॉ.चरणसिंग गुसिंगे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर



छत्रपती संभाजीनगर :प्रतिनिधी करमाड सर्कल मौजे शेवगा येथील सदनशील  शेतकरी हारसिंग गुसिंगे यांचे सुपुत्र चरणसिंग गुसिंगे हे साहित्यिक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे तसेच पत्नी पीडित पुरुषांच्या समस्यावर त्यांचे संशोधन कार्य उल्लेखनीय असल्यामुळे यांना  गोपाल किरण समाजसेवी संस्था मध्यप्रदेश यांचा समाजभूषण हा पुरस्कार जाहीर झाला आहे या बाबत श्री  प्रकाशसिंह निमराजे यांनी कळवले असून सदर पुरस्कार कन्याकुमारी येथे प्रदान करण्यात येणार आहे.
चरणसिंग यांनी साहित्यिक क्षेत्रात चारोळी, कविता, शेर शायरी, सन्मान माझ्या भारताचा भारतीय संविधानाचा भारतीय राष्ट्रध्वजाचा यावर त्यांनी शाळा, विद्यालय, महाविद्यालय येथे पथनाट्य सादर केलेले आहेत. एम.आय.डी.सी. संदर्भात त्यांचे लेखनीय काम आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या त्यांचा सहभाग आहे.तसेच नेट सेट पीएच डी  धारक संघर्ष समितीचे ते जिल्हा समन्वयक तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरचे समन्वयक म्हणून ही कार्यरत आहेत  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीत त्यांचा  विशेष सहभाग आहे. ग्रामस्वच्छता अभियान, बोर पुनर्भरण, शोषखड्डे, वृक्ष संवर्धन, सामाजिक एकात्मता  कुटुंब नियोजन शासकीय योजना अशा वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग आहे. संघटना सी संलग्न कार्य आहेत, उद्योग क्रांती उद्योजक संघ चे सल्लागार आहेत, आरुष बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे ते सचिव आहेत, बाध  कोराकारी प्रतिबंधक संघटनाचे ते संघटक आहेत,तसेचसामाजिक एकात्मता च्या पुढे यापुढे पत्नीपीडित आश्रमचे ते सचिव आहेत,  आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. यापूर्वी त्यांना अनेक स्तरावरील साहित्यिक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत.
त्यांना या पुरस्काराबद्दल त्यांच्या आई कामनबाई गुसिंगे, वडील हारसिंग गुसिंगे, भाऊ स्वर्णसिंग गुसिंगे, वहिनी वनिता गुसिंगे, बहीण कर्मवती बहुरे, भाऊजी  रामचंद बहुरे तसेच समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख तथा अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके, डॉ. लक्ष्मणसिंग साळोक, डॉ. संग्राम गुंजाळ, डॉ. पद्माकर सहारे, डॉ. सादिक बागवान तसेच  मोरेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भोकरदन, जि. जालना, प्राचार्य तथा विभाग प्रमुख, समाजशास्त्र विभाग डॉ. भगवान डोंगरे तसेच ,सेट नेट पीएचडी धारक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. परमेश्वर पोळ, डॉ.सुरेश देवढे, डॉ. प्रमोद तांबे, डॉ. रमेश वाघमारे, डॉ.भारत राठोड, डॉ. युवराज कठाळे, डॉ. संतोष जाधव, डॉ. विकास गवई डॉ.अमोल मस्के  तसेच पत्नी पीडित पुरुष आश्रम संस्थापक अध्यक्ष अँड. भारत फुलारे सल्लागार अँड विक्रांत कापसे तसेच  डाँ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजशास्त्र विभागातील कर्मचारी, गौतम खरात विजय मूळे विद्मापीठातील अनेक मान्यवरांनी त्यांचे  अभिनंदन केले आहे *

Post a Comment

0 Comments