जिल्हा परिषद महिला परिचर संघटना सलग्न (सिटु )
सर्व जिल्हा अध्यक्ष सचिव पदाधिकारी मंडळ यांना सुचित करण्यात येत आहे की दिनांक 11 12 13 या तीन दिवसीय धरणे आंदोलन मुंबई आझाद मैदान येते आपल्याला यशस्वी करायचा आहे सर्व माहिती घेत आहेत व हा नियोजन सगळं सिटू संघटना करीत आहे. तरी आपल्या संघटनेच्या इतिहासिक संपाला कुठेतरी यश येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि भगिनींनो यश प्राप्त करून घ्यायचं आहे तर प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याची जबाबदारी घेऊन सर्व महिला भगिनींना घेऊन आपल्या आंदोलनात सहभागी कराल असे मी आपल्याकडून अपेक्षा करीत आहे ही मागणी एकट्या कुणाची नसून आपली सर्वांची आहे आणि जबाबदारी पण आपलीच आहे. करिता भगिनींनो आपण घरामधून बाहेर पडावं आणि आपला यश पदरात पाडून घ्यावं कारण संख्या बळ असल्या शिवाय कुठलाही सरकार झुकत नाही. इसीलिए झुकाने वाले चाहिए. म्हणून भगिनींनो कुठलाही गैरसमज न ठेवता ही लढाई आपली आरपारची आहे आपल्या कार्यकाळात पूर्ण महाराष्ट्र राज्य भरात हे लढाई एकमेव आहे आणि हेच लढाई सर्वात मोठी लढाई असेल. बऱ्याच भगिनींना प्रॉब्लेम येतील कोणाचे पगार कपात होतील अशा पद्धतीने अडचणी निर्माण होतील त्याकरिता आपल्या संघटनेला धरून राहणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्व जिल्ह्यानी आपल्या महिला भगिनीची यादी करून. संघटनेला द्यावी.
त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यामधून किती महिला प्रतिनिधी येत आहेत याची माहिती पोलिसांनी मागवलेली आहे तरी भगिनींनो माहिती सादर करावी. ही विनंती
Post a Comment
0 Comments