चिखली : तालुक्यातील किन्होळा गावातील दलित
वस्ती सिमेंट रोड चे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले असून या प्रकरणातील सखोल चौकशी करून दोषीवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी तक्रार समाधान वानखेडे यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती चिखली यांना केली आहे. या तक्रारीप्रमाणे सण 2025 मध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत अंदाजपत्रक मंजरु झाले. अंदाजपत्रकाचा विचार न करता मनमर्जीने वाट्टेल तसे अल्प काँक्रेटचे रस्ते तयार करण्यात आले
ग्रामविकास अधिकारी व कॉन्ट्रॅक्टदार यांनी संगनमताने सदर रस्त्याचे काम हे नित्कृष्ट दर्जाचे केले असून सदर कामाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व सदर कामाचे कुठल्याही प्रकारचे बिल काढू नये काढल्यास ग्रामपंचायत समोर लोकशाही मार्गाने उपोषण, करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची असेल अशी मागणी समाधान वानखेडे यांनी गट विकास अधीकारी यांच्या कडे केली आहे
Post a Comment
0 Comments