महाराष्ट्र सरकार ने दिलेल्या निर्देशानुसार भारताच्या राष्ट्रीयगीत 'वंदे मातरम्'ची १५० वर्षे एक ऐतिहासिक उत्सव म्हणून, सेलू येथील नूतन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम राठोड यांच्या हस्ते 'वंदे मातरम् अर्धशताब्दी महोत्सवाचे' महाविद्यालयात उद्घाटन करण्यात आले. हा महोत्सव भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न असून या उत्सवामुळे राष्ट्रगीताचा गौरवशाली इतिहास स्फुरण पावणार आहे.
आज, १५० वर्षांनंतर, हे गाणे केवळ आपला सांस्कृतिक वारसाच नाही तर देशभक्तीचे एक कालातीत प्रतीक बनले आहे; असे मत प्राचार्य डॉ. उत्तम राठोड यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. जे. नाथांनी यांनी केले तर आभार डॉ. भाग्यश्री धामणगावकर यांनी मानले. प्रसंगी या कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा. प्रवीण सोनवणे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. प्रशांत देशपांडे, एचएसव्हीसी समन्वयक प्रा. ए.टी.मदने, प्रा. उंडेगावकर, प्रा. अविनाश सूत्रावे, प्रा. बेग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments