न्याय न मिळाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा....
चिखली - तालुक्यातील मौजे सोनेवाडी येथील गट नं.१० मधून गेलेला शेतरस्ता महसूल प्रशासनाने पोलिस संरक्षणात तात्पुरता खुला केला होता.परंतु, तो सोनेवाडी ते पांगरी सांडव्या लगतचा रस्ता कांताबाई शंकर डवळे या महिलेने अडेलपणा करीत पुन्हा अडवल्याने तो खुला करण्यात यावा,या मागणीसाठी सोनेवाडी येथील जनाबाई काळे, कुशीवर्ताबाई शेळके,मंगलाबाई काळे, कमलबाई गुंजकर, शे. भिकुबी शे. मुनीर यासह शेतकरी महिलांनी दि.२४ जानेवारीपासून तलावाच्या सांडव्यामध्ये बेमुदत उपोषण सुरू केले होते.अखेर तहसिलदार यांच्या लेखी अश्वासनानंतर उपोषण आंदोलन तुर्तास स्थगीत करण्यात आले आहे.नायब तहसिलदार खाडे, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक,नितिन राजपुत,भाजपचे मंदार बाहेकर,सुनिल पोफळे,सुधाकर तायडे,यांच्यासह आदिच्या हस्ते शरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली आहे.मागण्यांची पुर्तता न झाल्यास १५दिवासानंतर पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा सोनेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य सुधाकर तायडे, सुधाकर शेळके यांच्यासह आदींनी दिला आहे.
सोनेवाडी ते पांगरी रस्ता यापूर्वीच तात्पुरत्या स्वरूपात खुला करण्यात आला होता.आमदार सौ.श्वेताताई महाले व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मध्यस्तीने प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत, ऑगस्ट महिण्यामध्ये सांडव्या लगतचा सोनेवाडी ते पांगरी जाणारा रस्ता खुला देखील केला होता.परंतु, हाच शेतरस्ता एका महिलेने पुन्हा अडवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे.त्यामुळे सोनेवाडी येथील शेतकरी महिला उपोषणास बसल्या आहेत. याप्रश्नी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी उपोषणकर्त्या महिलांशी चर्चा करत,अधिकारीवर्गाची चांगलीच कानउघाडणी केली, व हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे सक्त आदेश दिले होते.क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी सुद्धा या प्रकरणी जलसंधारण विभाग,भुमि अभिलेख कार्यालयाकडे पाठपुरावा केला परंतू चाल ढकल पणा केला जात असल्याने क्रांतीकारी शेतकरी संघटनेने उपोषणस्थळी भेट देत आक्रमक भूमिका घेतली होती तर शेतकऱ्यांच्या या समस्येला जलसंधारण विभागास जबाबदार धरत आंदोलनाची वेळीत दखल न घेतल्यास शेतकऱ्यांसह तिव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला होता.दरम्याण दि ३१/०१/२०२५रोजी दुपारी १२ वाजता तहसिलदार श्री काकडे यांनी मध्यस्ती करत शेतकऱ्यांना तहसिल कार्यालयात बोलवून घेत हद्द निश्चित करवून घेवून योग्य कार्यवाही करण्याचे तोंडी अश्वासन विनायक सरनाईक यांच्या सोबतच्या चर्चेत दिले होते.दरम्याण सातव्या दिवसी नायब तहसिलदार श्री खाडे यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषण कर्ते महिला व शेतकऱ्यांच्या मागण्या जाणून घेवून लेखी अश्वासन दिल्याने उपोषणकर्ते महिला यांना क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व भाजपाचे पदाधिकारी यांच्या हस्ते शरबत देऊन उपोषण सोडवण्यात आले.
यावेळी यांच्यासह साखराबाई तायडे,कस्तुरबाई जंजाळ,अलकाबाई शिरसाठ,मंगलाबाई काळे,आशाबाई पवार,सुरेखा तायडे,स्वाती मेव्हणकर,सविताबाई काळे,जयश्री तायडे,वैशाली काळे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर तायडे, बबन काळे, ज्ञानेश्वर पंडित, सुधाकर शेळके, रुस्तुम शिरसाठ,अशोक काळे,भास्कर काळे,शिवाजी जंजाळ, राजेंद्र पवार,सतीश काळे, प्रकाश तायडे, शेख मुनिर,भास्कर काळे, माधव गुंजकर,रमेश शिरसाठ,शंकर जंजाळ, रायपूर पोलीस स्टेशनचे अनंत कळमकर,शे.अझरुद्दीन शे.काझी, ग्रामसेवक अनिरुद्ध खेडेकर,आरोग्य अधिकारी डॉक्टर सदावर्ते साहेब आरोग्य सेवक कस्तुरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
___________________
हद्द निश्चितनंतर महसुल प्रशासन देणार रस्ता...
जलसंधारण विभागाची हद्दनिश्चिती नसल्याने शेतकऱ्यांना वारंवार रस्त्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे.सदरील प्रकरणी मिटवण्याच्या दृष्टीने प्रशासन सरसावले असून जलसंधारण विभागाने मोजणीचे ३२हजार रुपयांचा भरणा केला असून या गटांची भुमि अभिलेख कडून मोजणी होवून हद्द निश्चित केल्यानंतर रस्ताच्या कायमस्वरूपी
प्रश्न निकाली निघेल ऐवढे जरी खरे असले तरी यामध्ये सबंधीत विभागाकडून दिरंगाई किवा चालढकल पणा झाल्यास आंदोलन छेडू असा इशारा ग्रामपंचायत सदस्य सुधाकर तायडे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.
__________________________
प्रकृती खालवल्याने महिलांनवर उपचार...
सात दिवस अन्न ग्रहण केले नसल्याने दोन महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते.मात्र उपचारा नंतर पुन्हा या महिलांनी आंदोलनात सहभाग नोंदवला होता.उपोषण सुटल्यानंतर यातील महिलांना उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.तर उपोषणकर्ते दोन महिलांना सलाईन देण्यात आले
________________________
Post a Comment
0 Comments