वाशिम : स्थानिक पोदार इंटरनॅशनल स्कूलचे ,८ वे वार्षिक स्नेह संमेलन दि.३०,३१ जानेवारी २०२५ रोजी वाशिम येथील वाटाणे लाॅनमध्ये दिमाखात साजरे केले गेले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून नवं व्यासपीठ मिळावं यासाठी स्थानिक पोदार शाळेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. यावर्षी विक्रम वेताळ आणि मैत्री या संकल्पनेच्या माध्यमातून नृत्य व नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केल्या. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे आपली कला दाखवत वेगवेगळे नृत्य सादर केले .या कलागुणांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेचे दर्शन घडविले.
या कार्यक्रमासाठी वाशिमचे पोलीस अधिक्षक अनुज तारे प्रमुख अतिथी , प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद घनवट, तहसिलदार निलेश पळसकर ,नायब तहसिलदार प्रतिभा चौधरी , पोलीस उपअधिक्षक लता फड, तसेच पोदारच्या विदर्भ विभागाचे क्षेत्र अधिकारी अमन टेमुर्डे , ह्या सर्वांची विशेष उपस्थिती होती. त्यांना नवनिर्वाचित संसद सदस्यांच्या पथसंचलना द्वारे मानवंदना देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वर्ग तिसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ताला - सुरात स्वागतगीत गायले. शाळेच्या प्राचार्या , प्रशासकीय अधिकार्यांनी प्रमुख अतिथींचे शाल , श्रीफळ,स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला . प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या नंतर शाळेचा वार्षिक अहवाल प्राचार्यांव्दारे सादर केला गेला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैदेही गोखले ,शारदा सावळे,ह्दयनाथ खंडाळेकर,स्नेहा पोद्दार यांनी केले.पर्यवेक्षक प्रविण ठोंबरे यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाला पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सोनाली दळवी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रणयसिंग राजपूत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्राचार्या आरती डोमकुलवार यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
Post a Comment
0 Comments