बुलढाणा विशेष प्रतिनिधी दिपक पिंपळे
सालाबादप्रमाणे ही याही वर्षी लोणार तालुक्यातील बीबी इथे
यावर्षी मोठ्या उत्साहात संतोषी माता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रे परंपरा गेल्या 46 वर्षापासून चालू आहे या यात्रेमध्ये बिबी व परिसरातील भावी भक्त या यात्रेसाठी व येथील संतोषी माता मंदिरामध्ये 14 जानेवारी तीळ संक्रात निमित्त महिलावर्ग वान देण्यासाठी येत असतात यात्रा 14 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत भरगच्चपणे भरत असते दिनांक 14 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत रात्रीच्या वेळी कीर्तनकाराचे कीर्तन आयोजन केले जाते त्यानंतर दिनांक 18 जानेवारी रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम गावातील प्रथम नागरिक म्हणून सरपंच पुत्र संतोष भाऊ गुलमोहर यांच्या हस्तेआयोजित केला आहे या यात्रेमध्ये अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी येथील ग्रामपंचायत च्या वतीने मोठा सहभाग घेऊन यात्रेची जागा सफाई करून पार्किंगची व्यवस्था पिण्याची पाण्याची व्यवस्था जागावाटप गावातील काही तरुण सेवक म्हणून तयार केले त्यामुळे या यात्रेला चांगल्या प्रकारचे वळण आले असे दिसून आले त्यानंतर त्यानंतर विचित्र घटना घडू नये म्हणून बीबीतील पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील युवक पोलीस मित्र मंडळ म्हणून या यात्रेमध्ये कार्यरत होते व पोलीस बंदोबस्त ही होता
Post a Comment
0 Comments