Type Here to Get Search Results !

जिल्ह्याचे सुपुत्र योगेश चित्ते मुंबई सीमा शुल्क विभागाचे संयुक्त आयुक्त


प्रतीनिधी राजु भालेराव

बुलडाणा, 27 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : UPSC परीक्षेद्वारे निवड झालेल्या, IRS सेंट्रल एक्साइज आणि कस्टम्स, २०१५ च्या  बॅचचे मौजे निमगाव गुरू, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा येथील सुपुत्र श्री योगेश चित्ते मुंबई सीमाशुल्क विभागाचे संयुक्त आयुक्त म्हणून पदोन्नती मिळवल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या अथक परिश्रमाने, प्रामाणिक सेवाभावी वृत्तीने त्यांना या मानाच्या पदापर्यंत पोहोचवले आहे. सीमाशुल्क क्षेत्रातील त्यांच्या निर्भीड निर्णयक्षमतेने आणि पारदर्शक कारभाराने प्रशासनाला अधिक सक्षम आणि न्याय्य बनवले आहे. राष्ट्रसेवेसाठी त्यांची असलेली निस्वार्थ तळमळ आणि प्रामाणिकता यामुळेते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्याच्या गौरवात भर पडली आसून निमगाव गुरु वाशीयांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे

Post a Comment

0 Comments