डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे डॉ.नॉर्मन बोरलॉक गहूचार्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी त्यांचा जीवनपट सांगताना प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना सारं जग गव्हाचार्य म्हणायचे. त्यांनी मेक्सिकोमध्ये आपल्या सहकाऱ्यांसमवेत तब्बल सोळा वर्षे गहू आणि त्यांच्या संकरित जातींचा विकास यावर संशोधन केलं.त्यांनी मेक्सिकोमध्ये आपल्या सहकार्यासोबत गव्हाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले. वेगवेगळ्या वातावरणात उगवू शकतील व लोंब्या आणि त्यातले दाणे जास्त असतील यावरती प्रयोग करण्यासाठी त्यांनी एकमेकांपासून एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेली व दोन्ही ठिकाणची उंची ,तापमान, प्रकाश असे ठिकाण निवडले. सातत्याने दहा वर्षे गव्हावरती संकरित जाती निर्माण केल्यात.
१९६०च्या दशकात जेव्हा देश अन्न समस्येसाठी झुंजत होता व भीषण दुष्काळ होता त्यावेळेस भारताच्या कृषी मंत्रालयाने डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या सहकार्याने डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना भारतात बोलवले व बोरलॉग यांच्या सहकार्याने १९६६ साली अधिक उत्पन्न देणारी सुमारे अठराशे टन बियाणं मेक्सिकोतल्या मका व गहू विकास केंद्रातून आयात करण्यात आली. या बियाण्यांचा वापर केल्याने आपल्या देशात गव्हाच्या उत्पादन दुपटीने वाढ झाली. १९७४ मध्ये भारताची हरितक्रांती झाली व आपण धान्यात स्वयंपूर्ण झालो असे सांगितले . कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी प्रा.किरण ठाकरे, प्रा. योगेश चगदळे, प्रा. विकास म्हस्के, आणि प्रा.अनुप वानखडे , रासयो स्वयंसेवक व सर्व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments