सिंदखेडराजा जीवन साळवे
परवा एका जाहीर सभेत भारतीय जनता पार्टीचे आमदार बबनराव लोणीकर भाषण करत असताना त्यांनी शेतकऱ्याच्या,शेतमजुराच्या व महिलांच्या बाबतीत असभ्य असे वक्तव्य केले आहे.यात ते म्हणतात, तुमच्या अंगावरचे कपडे, तुमच्या पायातील बूट आणि तुमच्या हातातील मोबाईल हा आम्ही दिलेला आहे. इतकच काय तर यावरच ते थांबले नाही तर आमच्या आई बहिणीला मिळत असलेल्या लाडली बहीण योजनेचे दीड हजार रुपये सुद्धा उचकून काढल्यासारखी भाषा त्यांनी वापरली आहे.त्यामुळे राज्यातील संपूर्ण महिलांचा अवमान त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील कृषी कन्या,सोयनदेव गावच्या माजी सरपंचा सौ जयश्री कायंदे यांनी आज या घटनेचा निषेध नोंदवत तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे, बबनराव लोणीकर हे मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यात कुठेही आले तर शेतकऱ्याची कन्या म्हणून माझ्यासह अनेक महिला भगिनी त्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही असा जळजळीत इशारा त्यांनी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
कोण आहेत जयश्री कायंदे?
आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत सिंदखेडराजा तालुक्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला सरपंच, म्हणून त्यांची भरीव कामगिरी राहिली आहे त्याचबरोबर आपल्या गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मंगळसूत्र दान केल्याचे आंदोलन राज्यभरात त्यावेळी गाजले होते. त्यांच्या या आंदोलनाने सरकार खडबडून जागे झाले आणि सोयंदेव गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ योजनेची मंजुरात दिली होती. अशा जयश्री कांयदे यांनी हे निवेदन दिल्यामुळे आधीच त्यांची आंदोलनात्मक पार्श्वभूमी असल्याकारणाने हा विषय तालुक्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे..
Post a Comment
0 Comments