परभणी जिल्हा :विशेष बातमी :सेलू
येथील नूतन महाविद्यालयातील कला शाखेची विद्यार्थ्यांनी अर्चना मोगरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक पदी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच त्या नाशिक येथून खडतर असे प्रशिक्षण पुर्ण करून महाराष्ट्र पोलीस दलात सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल नूतन महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम राठोड हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राजाराम झोडगे यांनी केले. यावेळी मोगरे यांनी विद्यार्थ्यांसमोर एम.पी.एससी परीक्षेसाठी ची तयारी व प्रशिक्षण कालावधीतील थरारक अनुभव मांडले. आपले मनोगत व्यक्त करतांना उपस्थित विद्यार्थ्यांनी कठोर ;मेहनत; जिद्म ;चिकाटी ;अभ्यासातील सातत्य आणि मोबाईल चा योग्य वापर करून यश संपादन करावे व आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करावा असा संदेश त्यांनी दिला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ.यु.सी.राठोड यांनी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा वर्गाचे व ग्रंथालयाचा विद्यार्थी यांनी पुरेपूर लाभ घेऊन यश संपादन करावे व अर्चना मोगरे यांचा आदर्श घेऊन आपल्या अभ्यासाची पुढील दिशा ठरवावी असे प्रतिपादन केले.व मोगरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या. या सत्कार प्रसंगी महाविद्यालयातील एन.एस.कार्यक्रम अधिकारी डॉ.सुरेश उगले यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन मोगरे यांचा सत्कार केला. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी व्हावा या करिता प्रा.अनंत मोगल, डॉ.विकास गवई, प्रा.हनुमान व्हरगुळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्याम आवटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.अनंत मोगल यांनी केले.
Post a Comment
0 Comments