मौजे किन्होळा ता.चिखली जि. बुलढाणा या गावी दिनांक 30 जानेवारी 2026 च्या मध्यरात्री गावातील काही गावगुंड, बदमास तरुणांनी .सम्यक बुद्ध विहार समोरील विद्युत मीटर उध्वस्त करून लाईन बंद केली. व अंधाराचा फायदा घेऊन, विहारातील महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना करण्याच्या हेतूने. त्यांनी मार्गक्रम केला. असता गावातील काही बौद्ध समाज बांधवांनी त्यांना बघितले, व त्यांना पकडले असता. ते निसटले. याप्रकरणी त्याच मध्यरात्री बौद्ध समाज बांधव पोलीस स्टेशन चिखली ला हजर झाले होते. मात्र त्यावेळी प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई न करता उडवा उडवी चे उत्तर दिले ,मात्र दुसऱ्या दिवशी आज दि. 31 जानेवारी 2026 रोजी , पोलीस स्टेशनला घेराव घातला. त्यातील एक आरोपी पकडला असून उर्वरित तीन आरोपी मात्र अद्याप पर्यंत फरार आहेत. पोलीस प्रशासनाने आश्वासन दिले की, उर्वरित आरोपींना तात्काळ शोधून आम्ही अटक करू. या अटीवर समाज बांधवांना शांत करण्यात आले.परंतु एक आरोपी हा चिखली मतदार संघ च्या सत्यधारी आमदार यांचे नातेवाईक असून त्या आरोपीना वाचविण्याचा प्रत्यन सत्य धारी आमदार करत आहे पोलीस प्रशासनावर दबाव टाकून हे प्रकरण दाबणायचा प्रयत्न करत आहे, पोलीस सांगतले नुसार तक्रार घेत नाही सरळ हा दलित समाजावर अन्याय होत आहे. पोलीस नी लवकर तर लव कर मुख्य आरोपी ला हजर करून योग्य कारवाई करावी ही दलित समाजची मागणी करत आहे.
Post a Comment
0 Comments