Type Here to Get Search Results !

आझाद समाज पार्टी (कांशीराम) जिल्ह्यात पुन्हा घोडदौड सुरू--जिल्हाध्यक्ष बुलढाणा भाई सिद्धांत वानखेडे

 दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी मौजे मेरा बुद्रुक ता. चिखली या ठिकाणी आझाद समाज पार्टी (काशीराम) प्रणित खा.भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर खंबीरपणे विश्वास ठेवत, अनेक तरुण कार्यकर्ते व महिला भगिनींचा पक्षप्रवेश करण्यात आला .यावेळी मौजे मेरा बुद्रुक येथील शेकडो पुरुष ,महिला व युवा तरुण उपस्थित होते .या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून आझाद समाज पार्टी चे जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखडे हे उपस्थित होते. देशभर खा. चंद्रशेखर आझाद यांचा अन्याय अत्याचार विरोधी व सर्व दलित, मागासवर्गीय ,मुस्लिम ,आदिवासी अशा विविध जाती धर्मांना सोबत घेऊन ,खा.चंद्रशेखर आझाद हे भीम आर्मी (भारत एकता मिशन) व आझाद समाज पार्टी (कांशीराम) हे संघटन उभे करीत आहे.म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये खेडोपाडी ,गावोगावी व शहरो-शहरी खा.चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात तरुण वर्ग मोठ्या संख्येने उभा राहत आहे. या कार्यक्रमामुळे मौजे मेरा बुद्रुक व आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये हर्ष -उल्हासाच वातावरण निर्मित झाला असून. येणाऱ्या काळामध्ये आझाद समाज पार्टी या पक्षात हजारोच्या संख्येने तरुण -युवा कार्यकर्ते सामील होणार आहेत . या कार्यक्रमांमध्ये अनेक महिला ,भगिनी व तरुण कार्यकर्ते यांनी जाहीर पक्षप्रवेश केला असून. त्यामध्ये  मायावती संतोष डोंगरदिवे - चिखली तालुका महिला आघाडी अध्यक्ष 
 सुरेखा अरुण डोंगरदिवे - चिखली तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष  
पवन संतोष डोंगरदिवे - चिखली तालुका संपर्कप्रमुख  
 उमेश भीमराव डोंगरदिवे - शाखाध्यक्ष मेरा बुद्रुक  
 मिलिंद राजू लहाने - शाखा प्रसिद्धीप्रमुख मेरा बुद्रुक नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष सिद्धांत वानखडे यांनी अभिनंदन करून त्यांना सदिच्छा शुभेच्छा दिल्या व आपण सर्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ तेवत ठेवण्यासाठी निश्चित प्रयत्न कराल अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा तरुण तडफदार मेरा बुद्रुक येथील प्रवीण भाऊ लहाने व सुनील भाऊ अंभोरे यांनी अपार प्रयत्न केले..

Post a Comment

0 Comments