भाऊ फाऊडेंशन महाराष्ट्र व शतोकान कराटे व क्रीडा मंडळ जालना यांचेकडून दिला जाणारा यंदाचा २०२५ चा राज्यस्तरीय कला रत्न पुरस्कार युवा.प्रबोधनकार देवानंद वानखेडे यांना जाहीर झाला असून ते पत्र ११ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांना प्राप्त झाले आहे. देवानंद गोविंदा वानखेडे हे रा.थार ता.मेहकर जि.बुलढाणा गावचे मूळ रहिवासी असून गेले. अनेक वर्ष ते सामाजिक, शैक्षणिक, उद्योग ,व राजकीय,क्षेत्रामध्ये बहुजन समाज हा प्रबळ झाला पाहिजे. या दृष्टीतून जनजागृती गायनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य करत आहेत.सामाजिक बांधिलकी जपत.
बुद्ध,शिव,फुले,शाहु,आंबेडकर यांचे विज्ञानवादी विचार सर्व बहुजन समाजा मधे आपल्या गायनाच्या व कलेच्या माध्यमातुन संपुर्ण महाराष्ट्रामधे नव्हे तर बाहेर राज्यात देखील आपला कला संच घेउन प्रबोधनाचे काम.करत आसतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रा तील अनेक शाशकीय विभागाचे सन्मान पत्र व तेसेच सामाजिक संस्थांनी सन्मानित केले आहे.जालना येथील भाऊ फाऊडेंशन महाराष्ट्र व शतोकान कराटे व क्रीडा मंडळ संस्थेने यंदाचा राज्यस्तरीय कला रत्न पुरस्कार जाहीर केला.आहे. त्यांना ३१ऑगस्टला नगरपरिषद मंगल कार्यालय भोकरदन येथे सन्मानित केले जाणार आहे .
Post a Comment
0 Comments