बुलडाणा प्रतिनिधी . दिपक पिंपळे
किनगाव जट्टू बीबी सर्कलमध्ये सर्कल मध्ये जातीय समीकरणे सुद्धा महत्वाची आहेत त्यातच प्रामुख्याने मराठा, ओबिसी समाज बौद्ध समाज हे मुख्य भुमिकेत
असले तरी निर्णायक भुमिकेत माळी मुस्लीम व वंजारी बंजारा समाज व इतर समाज सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. तेव्हा या सर्कल मध्ये अनेकांची कसोटी लागणार आहे असे दिसते त्यातच अनेक उमेदवार आपले नशीब आजमावतांना दिसतील. मात्र मतदार सुद्धा अतिशय जागृत झाला असून मतदार सुद्धा एक चांगल्या उमेदवाराच्या शोधात नक्कीच असेल, या मतदारसंघांमध्ये आता एक जिल्हा परिषद सर्कल व दोन पंचायत समिती आसल्यामुळे अनुसूचित जाती समाजाची मोठी ताकद उभी राहिली आहे.
किनगाव जट्टू सर्कल मध्ये सुद्धा काही प्रमाणात मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कभी खुशी कभी गम विविध अशी अवस्था झाली होती. पंचायत समिती निवडणुकीमध्ये जातीय समीकरणे महत्त्वाची आहे तितक्याच उमेदवार सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे बीबी किनगाव जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती सर्कल
अतिशय महत्त्वाचं आहे.
समाधान मुळे उपसरपंच यांना माननारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे कारण समाधान मुळे उपसरपंच हे स्वाभिमानी नेतृत्व समाजाशी एकनिष्ठता बाळगुन आंबेडकर विचारधारेला जोपासणार नेतृत्व आहे. समाधान मुळे यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे.
, तेव्हा आगामी स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत समाधान मुळे दिग्गज पक्षाच्या उमेदवाराना धुळ चारु शकतात कारण इथे एकाच जाती धर्माचे किवा पक्षाचे अनेक बंडखोरी करतील पण एस्सी समाजातून एकमेव उमेदवार जर समाधान मुळे निश्चित झाले तर एखट्या बौद्ध समाजासह अल्पसंख्याक समुदाय व उर्वरीत समाज सुध्दा समाधान मुळे यांच्या खांद्यावर पंचायत समितीची धुरा देऊ शकतो तेव्हा लवकरच या घडामोडी पहायला मिळतील.
Post a Comment
0 Comments