Type Here to Get Search Results !

नूतन महाविद्यालयच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे सायन्स एक्स्पो मध्ये घवघवीत यश

 सेलू :तालुका प्रतिनिधी : बिंदू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भोकर यांच्या वतीने आयोजित *DBC Science Expo 2026* मध्ये नूतन महाविद्यालय, सेलू येथील सूक्ष्मजीवशास्त्र( *Microbiology)* विभागाचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आपले वैज्ञानिक ज्ञान, सर्जनशीलता तसेच नाविन्यपूर्ण संशोधन कल्पना सादर करण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध झाले.
सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रतिकृती (मॉडेल्स), सेमिनार सादरीकरणे तसेच संशोधन पोस्टर्स प्रभावीपणे सादर केली.
प्राप्त यश यामध्ये महाविद्यालयाचे 
 *तृतीय क्रमांक* –समर्थ सचिन कुंडीकर (B.sc FY(Microbiology) *सेमिनार सादरीकरण
  *तृतीय क्रमांक* (यज्ञेश दिगंबरराव जोशी (B.sc SY, Microbiology) – पोस्टर सादरीकरण प्राप्त केलेआहे
या यशाबद्दल सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व त्यांचे मार्गदर्शकाचे्
   अभिनंदन नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया सर, सचिव प्राचार्य डॉ. व्ही.के.कोठेकर सर ,सहचिटणीस श्री.जयप्रकाशजी बिहाणी सर, प्रशासकीय अधिकारी डॉ.शरद एस.कुलकर्णी सर यांच्या सह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.सी.राठोड सर,उप.प्राचार्य डॉ.आर.एम.खाडप,
 IQACच्या समन्वयक डॉ.एन. एस. पद्मावत मँडम वनस्पतीशास्त्रचे विभाग प्रमुख डॉ.प्रकाश कंठाळे सर यांच्या सह सर्व प्राध्यापक वृंदाने डॉ.अमित कुलकर्णी सर यांच्या सह विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. हे यश सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची शैक्षणिक गुणवत्ता व संशोधनाभिमुख संस्कृती अधोरेखित करते तसेच नूतन महाविद्यालय, सेलू यांच्या लौकिकात भर घालणारे आहे.
 
या निवडीमुळे महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून डॉ.अमित कुलकर्णी सर आणि विजेते विद्यार्थी यांच्या वरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments